महाराष्ट्र 9

निरोप नव्हे तर शुभेच्छा समारंभ; कुरवेल येथे १०वीच्या विद्यार्थ्यांना निरोप व शुभेच्छा

[espro-slider id=13780]

*निरोप नव्हे तर शुभेच्छा समारंभ; कुरवेल येथे १०वीच्या विद्यार्थ्यांना निरोप व शुभेच्छा

चोपडा:- ( प्रतिनिधी ) —————-
छडी वाजे छमछम, विद्या येई घमघम’, असा शाळेचा प्रवास कधी संपतो हे ध्यानातच येत नाही. शाळा संपून आता कॉलेजमधील शिक्षण सुरू होणार याची चाहूल लागते ती शाळेतल्या या निरोप समारंभात. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या आठवणींना जसा उजाळा मिळतो, तसे पुढील करिअरसाठी ‘बेस्ट लक’ हे शब्द पाठबळ देऊन जातात.

दि २४ वार बुधवार रोजी कुरवेल हायस्कूल कुरवेल इयत्ता १०वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे चेअरमन व्ही .बी. पाटील हे होते तसेच शालेय समितीचे सदस्य काशिनाथ भोजू चौधरी ,के जी चौधरी तर चोपडा येथील कन्या माध्यमिक विद्यालयाचचे शिक्षक व्ही पी चौधरी हे उपस्थीत होते . कार्यक्रमाचे प्रस्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक ए .एम. पाटील यांनी केले .त्यांनी आतापर्यंत ची विद्यालयाची यशस्वी वाटचाल भविष्यातील योजना विषयी माहिती दिली.चोपडा येथील कन्या माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व्ही .पी. चौधरी यांनी समाजासाठी एक चांगला नागरिक निर्माण करण्याचे काम या विद्यालयाने केले आहे.भविष्यात आई वडिलांची स्वप्न पूर्ण करा.समाजाच्या उपयोगात आपल्याला कसे उपयोगात येता येईल तसेच पेपर सोडवताना वेळेचे नियोजन कसे करावे विज्ञान व गणित या विषयांची भीती न बाळगता त्यांना सोप्या पद्धतीने लिहण्याची पध्दतीविषयी त्यांनी सांगितले. व ए .व्ही. पाटील यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी विद्यालयातील आठवणींना उजाळा दिला.सूत्रसंचलन जी आर पाटील सर यांनी केले तर व्ही बी पाटील यांनी आभार मानले सूत्रसंचलन जी आर पाटील सर यांनी केले.यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]