हिंदूराजे गृपतर्फे महाशिवरात्रीला नेहरू वसतीगृहात फराळाचे वाटप

चोपडा, दि. 22 (प्रतिनिधी) _येथील हिंदूराजे गृपतर्फे महाशिवरात्रीचे महापर्वावर सामाजिक बांधीलकी जोपासत डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्था संचलित कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे वसतिगृहात साबुदाणा खिचडी, फळे, वेफर्स आदी फराळाचे पदार्थ वाटप करून आदिवासी विद्यार्थीनींच्या चेहर्यावर हास्य खुलवण्याचा हृदयस्पर्शी कार्यक्रम सोत्साहात पार पडला.
हिंदूराजे गृपतर्फे सदोदित शहरात जन सामान्यांच्या मदतीला धावण्यात पुढे असून गृपचे अध्यक्ष महेंद्र भोई गरजू गरजवंतांसाठी सामाजिक बांधिलकी जोपासून तरूणांच्या फौजेने मदतीचा हात देतात. त्यांच्या पुढाकाराने हा महाशिवरात्रीचा योग घडून आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भाजपा राज्य पदाधिकारी मग्न बाविस्करसर यांनी भूषविले. यावेळी युवासेना प्रमुख प्रदीप बारी, राजेगृप अध्यक्ष महेंद्र भोई, ज्येष्ठ पत्रकार अनिलजी पालिवाल, प्रवीण चावरे, निखिल सावळे, वसतीगृह सचिव संजय शिरसाठ, भावेश पाटील, गोपाल बाविस्कर, देवेंद्र पाटील, मुरलीधर साळुंखे, वसतीगृह अध्यक्ष महेश शिरसाठ, गणेश पाटील,आकाश भोई, राहुल पारधी, अनिल भोई, सुनील पाचोने, रोशन चौधरी, विशाल चव्हाण , गणेश भोई, सत्यम पारधी, आदर्श जाधव, सागर कोळी, भूषण भोई, श्रावण भोई आदी उपस्थित होते. सुत्रसंचलन अनिलजी पालीवाल यांनी तर आभार संजय शिरसाठ यांनी मानले.