महाराष्ट्र 9

चोपडा नगर पालिका कार्यालयाच्या प्रवेशस्थळी महाराजांचे तैलचित्र गडाचे अनावरण

[espro-slider id=13780]

चोपडा नगर पालिका कार्यालयाच्या प्रवेशस्थळी महाराजांचे तैलचित्र गडाचे अनावरण

चोपडा प्रतिनिधी :- चोपडा नगर परिषदे तर्फे अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत शिवश्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 390 व्या जयंती निमित्त नगर परिषद कार्यालयाच्या प्रवेशस्थळी छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य दिव्य आणि मनमोहक तैलचित्र गडाचा आराखड्यासह सुशोभित करून आज समस्त शिवप्रेमींना , हिंदू बांधवांना मराठी मनाला आनंद दिला तो गगनात मावेनासाच आहे .चोपडा नगर परिषदेत आजच्या नंतर जो कोणी आपली कैफियत घेऊन जाईल, त्याला शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या दरबारात गेल्याचा अनुभव नक्कीच येईल.आणि आमच्या राजाच्या दरबारात कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता नगर परिषदेत बसलेले राजांचे सारेच मावळे घेतील .कारण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या आस – पास जरी उभे राहिलो तरी अंगात स्वराज्य संचारते , अन्यायाच्या विरुद्ध लढण्याची शक्ती आपोआप संचारते , कोणावर कुरघोडी तर होत नाही ना ? हा विचार आपसूक येतो, महिला ,माता,भगिनी यांचे संरक्षण करण्याचे बळ मिळते.असा आमचा राजा शिवछत्रपती त्यांच्या जयंती निमित्त चोपडा नगर परिषदे तर्फे तैलचित्र गडाचे अनावरण करण्यात आले .चोपडा नगर परिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य, पदाधिकारी, कर्मचारी नगराध्यक्ष सौ मनीषाताई , गटनेते जीवनभाऊ, मुख्याधिकारी श्री अविनाश गांगोडे,उपनगर अध्यक्ष भूपेंद्र गुजराथी,नगर सेवक राजेंद्र देशमुख उपस्थित होते

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]