महाराष्ट्र 9

ट्रक व आयशरची समोरासमोर धडक १ठार २ गंभीर जखमी

[espro-slider id=13780]

ट्रक व आयशरची समोरासमोर धडक १
ठार २ गंभीर जखमी

चोपडा प्रतिनिधी :-शिरपूर चोपडा रस्त्यावर तरडी गावाजवळील पुलावर सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ट्रक व आयशर यांच्यात समोरासमोर धडक होऊन मोठा अपघात झाला या अपघातात आयशर चालकाचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण जबर जखमी झाले आहेत याबाबत सविस्तर वृत्त असे की शिरपूर कडुन चोपडाकडे जाणारा कापसाने भरलेला आयशर क्रमांक एम एच १८ एए ८१२२ ला चोपडा कडुन शिरपूर कडे जाणारा ट्रक क्रमांक एम एच १८एम २६०५ ने जोरदार धडक दिली.यात आयशरचा चालक राहुल रोहीदास रणदिवे वय अंदाजे ३५ राहणार मुकटी याचा जागीच मृत्यु झाला.तर शेतकरी भरत दगडु पाटील रा.मुकटी व ट्रक चालक विष्णु गिरीष बाविस्कर रा.लासुर हे गंभीर जखमी झाले असुन सर्वांना तातडीने उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले.

ट्रक व आयशर मध्ये झालेले ही धडक इतकी भयावह होती की आयशर चालक हा कॅबीन मध्ये अटकल्याने या चालकास बाहेर काढणे मोठे जिकिरीचे ठरले बभळाज व तरडी येथील महेंद्र राजपुत,अमोल पाटील,सागर पाटील,विजय पाटील,भोजु बावा व तरुणांनी मोठया शर्थीचे प्रयत्न करुण बाहेर काढून राजकुमार जैन यांच्या गाडीने तातडीने शिरपूर रुग्णालयात पाठवीण्यात आले.या वेळी रस्त्यावर कापुसच कापुस पसरलेला होता.या वेळी रोडाच्या दोन्ही बाजुला वाहनांच्या रांगाच रांगा लागल्याने वाहतुकीचा चांगलाच खोळंबा झाला या अपघाताची माहिती कळताच थाळनेर पोलीस स्टेशनचे सपोनि सचिन साळुखे, पीएसआय नवनाथ रसाळ आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होऊन खोळंबलेली रहदीरी सरळीत केली.

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]