महाराष्ट्र 9

चोपडा मंडळ अधिकारी एसीबी च्या जाळ्यात,१८महिन्यात दुसऱ्यांदा कार्यवाही करण्यात आली

[espro-slider id=13780]

चोपडा मंडळ अधिकारी एसीबी च्या जाळ्यात,१८महिन्यात दुसऱ्यांदा कार्यवाही करण्यातआली

चोपडा प्रतिनिधी:- वाळू वाहतुकीदरम्यान ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी दरमहा आठ हजार रुपये लाचेची मागणी करणा-या चोपडा मंडळ अधिका-यांना जळगाव एसीबीच्या पथकाने आज मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास खासगी पंटरसह अटक केल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे. राजेंद्र आधार वाडे(५०) आंबेडकर नगर चोपडा व खासगी पंटर समाधान रमेश मराठे (२४)(पाटील गढी चोपडा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
विशेष म्हणजे तिन दिवसांपुर्वीच शेतीच्या मृत्यू पत्रांन्वये बाजूने निकाल देण्यासाठी १५ हजाराची लाच मागणा-या चोपडा नायब तहसीलदार जितेंद्र मच्छिंद्रनाथ पंजे (४६ आदर्श नगर विश्वकर्मा सोसायटी जवळ जळगाव ) यांना लाच घेतांना जळगाव एसीबी पथकाने बुधवारी रंगेहाथ अटक केली होती. लाच घेतांना सलग दुसरी घटना घडल्याने चोपडा येथे लाचखोरांचे धाबे दणाणले आहे.
या बाबत वृत्त असे की चोपडा तालुक्यातील २५ वर्षीय तक्रारदाराचे ट्रॅक्टर असून या ट्रॅक्टरद्वारे वाळू वाहतूकीचे काम चालते. याबाबत कारवाई टाळ्ण्यासाठी दरमहा आठ हजार रुपये लाच देण्याची मागणी आरोपी मंडळाधिकारी वाडे यांनी शुक्रवारी आठ हजाराची लाच मागीतली होती. या ससंदर्भात जळगाव एसीबीकडे तक्रार देण्यात आली होती. त्यानुसार सापळा लावण्यात आला होता. मध्यरात्री १२,३० वाजेनंतर आरोपीने लाच स्विकारताच त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
या कारवाईत एसीबीचे पोलिस अधिक्षक सुनील कडासने, अप्पर पोलिस अधिक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधिक्षक जी.एम.ठाकुर, पोलिस निरिक्षक निलेश लोधी, संजोग बच्छाव, एएसआय रविंद्र माळी, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुरेश पाटील, सुनिल पाटील, नाईक मनोज जोशी यांनी कारवाई केली.

राजेंद्र आधार वाडे यांना दी.१०/०८/२०१८ रोजी अमळनेर येथे कार्यरत असताना जातीचे प्रमाणपत्र काढून देण्याकरता लोक सेवकाकडून ८००० हजाराची लाच घेताना अटक करण्यात आली होती आणि चोपडा येथे पण ८०००हजाराची लाच घेताना अटक कण्यात आली हा एक योगायोग असवा

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]