महाराष्ट्र 9

चोपडा महाविद्यालयात वाड:मय मंडळातर्फे ‘पोस्टर स्पर्धेचे’ आयोजन

[espro-slider id=13780]

चोपडा महाविद्यालयात वाड:मय मंडळातर्फे ‘पोस्टर स्पर्धेचे’ आयोजन


चोपडा: महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील वाड:मय मंडळातर्फे ‘पोस्टर स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य .एन.एस.कोल्हे, पोस्टर स्पर्धेचे परीक्षक डॉ. विनोद रायपुरे (अध्यक्ष, समाजकार्य अभ्यास मंडळ क.ब.चौ.उमवि, जळगाव), दीलीप पाटील (हिंदी विभाग प्रमुख, पंकज महा.चोपडा), श्री.अजय पाटील (पंकज महा.चोपडा), वाड:मय मंडळ प्रमुख श्री.ए.बी.सूर्यवंशी, सौ.एम.टी.शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते. या उदघाटन समारंभाचे प्रास्ताविक व उपस्थित मान्यवरांचा परिचय श्री.ए.बी.सूर्यवंशी यांनी करून दिला.
या स्पर्धेत हिंदी, मराठी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र व मानसशास्त्र या विभागातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांच्या पोस्टरचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी यांनी निरीक्षण केले. विषयानुसार व ज्वलंत प्रश्नांवर आधारित पोस्टर विद्यार्थ्यांनी सादर केले. तसेच परीक्षणात परीक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक अशी उत्तरे विद्यार्थ्यांनी दिलीत. या पोस्टर स्पर्धेला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भेट देऊन उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. या पोस्टर स्पर्धेप्रसंगीं आलेल्या परीक्षकांनी महाविद्यालयात चालणाऱ्या बेस्ट प्रॅक्टिस ‘नो व्हेईकल डे’ व ‘वाढदिवसाच्या निमिताने वृक्ष लागवड’ इत्यादी संदर्भात गौरवोद्गार काढले.
या पोस्टर स्पर्धा आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष मा.भैय्यासाहेब अॅड. संदीप सुरेश पाटील, उपाध्यक्षा सौ.आशाताई पाटील, सचिव डॉ.सौ.स्मिताताई संदीप पाटील, प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी डॉ.एस.ए.वाघ, श्री.एम.एल.भुसारे, .डी.डी.कर्दपवार, डॉ.आर.आर.पाटील, .वाय.एन.पाटील, .एम.बी.पाटील, सौ.एस.बी.पाटील, सौ.संगीता पाटील यांनी परिश्रम घेतले. यावेळी बहुसंख्य विद्यार्थी, प्राध्यापक बंधू-भगिनी व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]