महाराष्ट्र 9

ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल चा स्पार्क २०२० सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा

[espro-slider id=13780]

ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल चा स्पार्क २०२० सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा
यशोधन चॅरिटेबल ट्रस्ट संचालित ऑर्किड इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात स्पार्क २०२० या तिसऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आ.सौ.कल्पनाताई यशवंत पाटील ,सभापती पं. स. चोपडा, मा. नारायण दादा पाटील,सभापती कृषि उत्पन्न बाजार समिती चोपडा, आ.डॉ. सौ. भावना भोसले गटशिक्षणाधिकारी चोपडा, नंदकिशोर संगोरे सरपंच हिंगोणा, दिलीप पाटील गरताडकर, राम विठ्ठल पाटील मजरेहोळकर,अशोक अग्रवाल, प्रा. डॉ. प्रकाश लोहार,सौ. शर्मिला जैन, अशोक जैन, एस. टी. कुलकर्णी, आप्पासो रामदास पाटील ,यशवंत पाटील,सौ. शैला राम सोमाणी,कांतीलाल पाटील,डॉ. निशांत सय्यद,चंद्रकांत पाटील,मिलिंद सोनवणे,डॉ. प्रशांत पाटील, सुधाकर गजरे,नरेंद्र सोनवणे, धनराज बडगे, संस्थेचे अध्यक्ष डॉ. राहुल पाटील,डॉ. तृप्ती पाटील,ज्योती टाटिया,शाळेच्या प्राचार्या परमेश्वरी आदी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले,याप्रसंगी मान्यवरांचा हस्ते ऑलिंपिऍड स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या महर्षी बाविस्कर , सुयश वाघमारे, आर्या पाटील, परी पाखले, नियती पाटील,वैष्णवी जाधव या विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल देण्यात आले.


शैक्षणिक वर्ष २०१८/१९ साठी पलक बाविस्कर,हिरल जाधव,आर्या लवटे, हर्षल पाटील,आर्या पाटील,वैष्णवी जाधव यांना उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून गौरविण्यात आले तसेच शै. व.२०१९/२० साठी रिया कलानी यांना उत्कृष्ट शिक्षकाचा पुरस्कार देण्यात आला.यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाळेच्या वेबसाईटचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस आ.नारायण दादा पाटील यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या जगात कशाप्रकारे घडवायचे याबाबत मार्गदर्शन केले तर संस्थेचे अध्यक्ष डॉ. राहुल पाटील यांनी पालकांशी संवाद साधून विद्यार्थ्यांना कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर नृत्य सादर केले तर बाकी विद्यार्थ्यांनी से नो टू प्लास्टिक, हिस्टोरीकल ऍक्ट, मोबाइलचे वाईट परिणाम, टीचर्स फनी ऍक्ट,गूगल बॉय, गूगल गर्ल,डिबेट ऑन एक्साम तसेच इतर विद्यार्थ्यांनी सोलो गाण्यांवर नृत्य सादर करुण सर्व उपस्थित मान्यवरांचे तसेच पालकांचे मन जिंकुन घेतले.या कार्यक्रमाचे मान्यवरांनी तसेच पालकांनी फारच कौतुक केले.सूत्रसंचालन नितेश वाघ आणि दिपाली पाटील यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी रिया कलानी, लिपिका नागदेव, श्रद्धा देशमुख, सपना पवार,अनिता पाटील, दिनेश नाथबुवा, राजू कुरोसियाआदींनी खूप परिश्रम घेतले.

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]