महाराष्ट्र 9

विटनेर येथे उद्या परम दैवत संत श्रावणबाबा यात्रोत्सव.

[espro-slider id=13780]

विटनेर येथे उद्या परम दैवत संत श्रावणबाबा यात्रोत्सव.


चोपडा:-(प्रतिनिधी) तालुक्यातील विटनेर येथे माघ शु.अष्टमी म्हणजे २फेब्रुवारी रविवार रोजी विटनेर येथील जागृत देवस्थान गावाचे परम दैवत संत श्रावणबाबा यात्रोत्सव.या यात्रा उत्सवाला ऐतिहासिक व पौराणिक असा इतिहास आहे.संत श्रावणबाबांचे संजिवन समाधी स्थान असलेले तापीकाठावरील कृषीप्रधान अर्थव्यवस्था असलेले लहानसे पण आदर्श गाव म्हणजे विटनेर.या विटनेर गावाने तालुक्यापासून थेट राजधानी दिल्लीपर्यंत मजल मारून पंचक्रोषीत स्वतःचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केले आहे.सर्व समाजबांधव गुण्यागोविंदाने एकमेकांच्या हातात हात घेवून सुखदुःखात सहभागी होतात.अनेक चढउतार या गावाने पाहिले आहेत.वारकरी सांप्रदयाची थोर परंपरा येथील मातीला लाभली आहे.दरवर्षी आषाढी तसेच कार्तिकी एकादशीला पायी दिंडीचे आयोजन केले जाते.प्रत्येक एकादशीला किर्तन तसेच हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते.रोज प्रभात फेरी व हरीनाम पठन होते त्यामुळे हरिपाठ अबालवृध्दांच्या मुखोद्गत आहे.ज्ञानेश्वरी,भागवत,गाथा पारायण असे विविध संस्कारक्षम उपक्रम येथे वर्षभर राबविले जातात ज्यामुळे नवीन पिढीवर आपोआप संस्कार होत आहेत.


यात्रेसाठी पूर्ण गाव 10 दिवस अगोदर एकत्र येवून पूर्ण गावाची सफाई व घरांची रंगरंगोटी केली जाते.तापी काठावर निसर्गरम्य वातावरणात नवस फेडण्याचा कार्यक्रम असतो.त्यात वरणभात,बट्टी,वांग्यांची भाजी असा स्वादीष्ट मेनू असतो.येथील प्रसादाला विशिष्ट अशी चव असते.या दहा दिवसात कुणीही बाहेरचा पाहूणा उपाशी जात नाही.नोकरी किंवा व्यवसाया निमित्त बाहेर गेलेले ग्रामस्थ सूटी काढुण गावातील यात्रेला हजेरी लावतात.पूर्ण गावात उत्साह ओसंडूण वाहतो.
परीसरातील दूकानदार आपली दूकाने थाटतात.मिठाई,खेळणी यांची रेलचेल असते.मनोरंजना साठी 4 तमशाफळाचे आयोजन असते.अगदी स्वंय शिस्तीत हा उत्सव पार पाडण्या साठी सवॅ ग्रामस्थ सक्रीय सहभाग घेतात.
परीसरातील अंजती वढोदा दगडी मोहिदा होळनांथा वाळकी कूसूंबा घोडगाव गंलगी.कलाली हिगोणा अनवदॅ या गावांचे नागरीक हजारोच्या संख्यने उपस्थित असतात.
माजी जि.प.सदस्य व जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा इंदिराताई पाटिल यांचे कुशल नेतृत्व गावाल लाभले आहे.ग्रामपंचायत आणि विविध कार्यकारी सोसायटी वर पूर्ण महिलाराज आहे.गावात माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी भव्य सभागृह बांधून गावाची सोय केली आहे.स्त्रीपूरूष समानता वैज्ञानिक दृष्टीकोण समोर ठेवून गावाचा सर्वांगिण विकास होत आहे.परीसरात आदर्श गाव म्हणून नाव लौकीक आहे.

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]