
चोपडा (प्रतिनिधी),चोपडा न्यायालयाने चेक अनादर झाल्या प्रकरणी आरोपीस एका वर्षाचा कारावासासह विस लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली असुन दंडाची रक्कम न भरल्यास तीन महिने जादा कारावासाची शिक्षा दिली आहे तसेच दंडाची संपुर्ण रक्कम फिर्यादीला नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेश १० जानेवारी रोजी केलेला आहे त्यामुळे चेक धनादेश देऊन फसवणूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत
अधिक वृत्त असे की,नाशिक येथिल रहिवासी सुदर्शन प्रदिप शिंदे याने त्याची आर्थिक गरज भागविण्यासाठी चोपडा येथील त्याच्या मित्र संजय साहेबराव मोरे यांच्याकडे वेळोवेळी हात उसनवार म्हणून १६ लाख रुपये घेतलेले होते त्या रकमेचा परडफेड करण्याचा मोबदल्यात आरोपी सुदर्शन शिंदे याने संजय मोरे यांना त्यांचे बचत खात्याच्या धनादेश देऊन उसनवार रक्कम परत करण्याची हमी दिलेली होती मात्र शिंदे याने यांचे बचत खात्यामध्ये रक्कम शिल्लक न ठेवता धनादेशाचा अनादर केला त्यामुळे संजय मोरे यांची फसवणूक केली म्हणून आरोपी विरुध्द निगोशिएबल इन्स्ट्युमेंट अँक्ट कलम १३८ प्रमाणे चोपडा न्यायालयात खटला दाखल केला होता त्या अनुषंगाने फौजदारी खटल्याचा चौकशीअंती फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश पी,बी.पळसपगार यांनी दि.१० जानेवारी २०२० रोजी न्यायनिर्णय देऊन आरोपी सुदर्शन शिंदे यास एक वर्षे सक्त मजुरी तसेच विस लाख रुपये दांडाची शिक्षा ठोठावली आहे तसेच दंडाची रक्कम न भरल्यास पुन्हा तीन महिने जादाची शिक्षा दिली असुन दंडाची संपूर्ण रक्कम फिर्यादी संजय मोरे यांना देण्याचा देखील आदेश न्यायालयाने पारित केला आहे फिर्यादीकडुन अँड्.प्रसाद काबरा व अँड्.किरण जाधव यांनी काम पाहिले