
निमगव्हाणला तापीमाई चषक क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन
चोपडा – तालुक्यातील निमगव्हाण येथे तापीमाई चषक २०२० अंतर्गत भव्य प्लास्टीक बाॅल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन दि.२६ रोजी भाजपचे नेते घनश्याम अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून निमगव्हाणचे उद्योजक आर.सी.पाटील, सरपंच मंगला कैलास पाटील, उपसरपंच ज्योती कोळी, ग्रामसेवक जनार्दन विसावे, वेलेचे माजी उपसरपंच विनोद पाटील,पत्रकार तथा दोडे गुर्जर संस्थानचे विश्वस्त प्रविण रमेश पाटील, सागर पठार आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर स्पर्धेत पहिल्या दिवशी मित्रा ग्रुप, चौगाव व राजे ग्रुप, अमळगाव यांच्यात जोरदार असा सामना रंगला यात चौगावचा संघ विजयी ठरला पंच म्हणून सचिन बाविस्कर, किरण पाटील यांनी काम पाहीले.
स्पर्धेची नोंदणी चालू आहे, नोंदणीसाठी ९८२३९१०५०७ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

स्पर्धेसाठी ग्रामसेवक जनार्दन विसावे,ग्रामविकास अधिकारी कैलास पाटील, निमगव्हाण येथील लक्ष्मण बाविस्कर, दिलीप पाटील, रमेश ओंकार पाटील, नरेंद्र मैराळे, दिपक बाविस्कर, संजय बि-हाडे, तांदलवाडी येथील माजी सरपंच सिताराम कोळी, तापी सूतगिरणीचे संचालक राजेंद्र पाटील, नंदलाल धनगर,प्रविण पाटील (घाडवेल), तापी फाऊंडेशन, वैष्णवी टेंट हाऊस यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
स्पर्धेस्थळी पंच म्हणून सचिन बाविस्कर, किरण पाटील यांनी काम पाहीले.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी आयोजक तथा तापी फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल बाविस्कर, आनंद बाविस्कर, दिपक सैंदाणै, अरूण पाटील, दिपक बाविस्कर, हर्षल पाटील, किशोर बाविस्कर, प्रशांत पाटील, कोमलसिंग जाधव, रोहन बाविस्कर, प्रविण पाटील आदी परीश्रम घेत आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.शशिकांत बि-हाडे यांनी केले.
स्पर्धेचा शुभारंभ निमगव्हाण येथील श्री.धुनिवाले दादाजी दरबारच्या पायथ्याशी झाला.