महाराष्ट्र 9

पती पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना पत्नीचं निघाली कॉल गर्ल

[espro-slider id=13780]

पती पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना पत्नीचं निघाली कॉल गर्ल

अमरावती, दि. २४ :- पती – पत्नीच्या नात्याला
काळीमा फासणारी घटना अमरावती मध्ये नुकतीच घडली. पत्नी मैत्रिणीच्या लग्नात जाण्याचा बहाना करून घराबाहेर जाते. आता पत्नी घरी नसल्याचं साधून पतीने कॉलगर्लला फोन केला. पण जेव्हा तिला भेटायला गेला
तेव्हा ती पत्नीच निघाली. त्यानंतर संतापलेल्या पतीने पत्नीची रस्त्यावर धुलाई केली अन् पत्नीनेही पतीला शिवीगाळ करून पळ काढला.घडलेली हकीकत अशी की, अमरावती येथील उच्चभ्रू वस्तीत राहणारे 38 वर्षीय पुरुष आणि 34 वर्षीय महिलेचा गुण्यागोविंदाने संसार सुरू होता. मात्र, बुधवारी 22 जानेवारी त्यासाठी धक्कादायक आणि संसाराच्या
जीवनाला कलाटणी देणारा दिवस ठरला.
बुधवारच्या दिवशी पत्नीने मैत्रिणीच्या लग्नात जायचेआहे, सायंकाळपर्यंत परत येईल असं सांगून घराबाहेर निघाली. पत्नी घराबाहेर जाताच पतीने आपल्या मित्राला कॉल करून कॉल गर्ल नंबर मागितला. पतीने कॉल गर्ल ला आपल्या नियमित मोबाईलवरून कॉल केला. कॉल गर्लने तो कॉल स्वीकारून केव्हा आणि कुठे भेटायचं ठरलं. त्यानंतर थोड्याच वेळात कॉलगर्ल फोन आला निश्चित कुठे यावं याबाबत विचारणा होती. तिला पत्ता माहित नसावा असे समजून पतीने शहरातील राठीनगर येथील एका ठिकाणी भेटण्यासाठी बोलवल्या ठिकाणी दोघेही पोहोचले एकमेकांचा शोध सुरू झाला स्कार्फ बांधून उभी असलेली महिला फोनवर
बोलताना पाहून पतीदेव तिच्याजवळ पोहोचला आणि काय आश्चर्य कॉलगर्ल म्हणून आलेली ती महिलाच चक्क त्याची पत्नी निघाली.आता पत्नी चे बिंग फुटताच दोघांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक उडाली. आपली पत्नी कॉल गर्ल निघाल्यामुळे पतीचा पाचर धाऱ्यावर बसली. तर आपला पती आपल्या माघारी असे कृत्य करतो हे कळल्यावर पत्नीचा पारा चांगलाच चढला. त्यानंतर दोघांमध्ये रस्त्यावरच
कडाक्याचे भांडण सुरू झाले.एवढंच नव्हे तर संतापलेल्या पतीने भररस्त्यावर पत्नीला चांगलेच बदडले तर पत्नीनेही पतीला
मारहाण केली. बघता बघता बघ्यांची चांगलीच गर्दी झाली. आधी पती-पत्नीचे भांडण म्हणून कुणीही त्यांच्यामध्ये पडायला तयार नव्हते. पण त्यांच्या भांडणातूनच असा प्रकार असल्याचं समोर आलं.अखेर पत्नीने काढता पाय घेत तिथून निघून त्यानंतर पती ही निघून गेला.या घटने नंतर सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]